अंबरनाथ : महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे बैलगाडी शर्यतीवरून दोन गटात झालेल्या हाणामारीनंतर 13 नोव्हेंबर रोजी सुदामा हॉटेल परिसरात 20 ते 22 राउंड गोळीबार झाला, या प्रकरणी आता 33 आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी आरोपींवर मोक्का कलमांतर्गत कारवाई करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळेच बैलगाडी शर्यती प्रकरणावरून झालेल्या गदारोळानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्धची कारवाई आणखी कडक केली आहे.
#Ambarnath #BailgadaSharyat #Shootout #Ambernath #CrimeNews #ThanePolice #MaharashtraPolice #Conflict #Fight #Attack